सत्यमेव जयते
Gram Panchayat Ravalgao
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिध्द केली जाते.
सन २०१६-१७ पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे.
या योजनेत लाभार्थ्यांच्या निवडीकरिता सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ मधील माहितीचा वापर केला जातो. तसेच राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात आली आहे.
घरकुल अनुदानाव्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत ९०/९५ दिवसांची अकुशल मजुरी स्वरूपात अतिरिक्त अर्थसहाय्य दिले जाते.