बांधकाम


उप अभियंता पंचायत समिती मालेगाव हे या विभागाचे प्रमुख आहेत या विभागाला केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा परिषद यांचे कडून विविध योजनेअंतर्गत विकास कामांना अनुदान प्राप्त होत असते सदर अनुदानातून ग्रामीण भागात रस्ते पूल व मोऱ्या, आरोग्य, इमारत बांधकाम, दुरुस्ती चौक सुशोभिकरण,गटारी इ. बांधकाम स्वरूपाची कामे केली जातात
तांत्रिक कामकाज उदा. सर्व्हेक्षण करणे, अंदाजपत्रके आराखडे तयार करणे त्यांना तांत्रिक मान्यता देणे या सर्व कामांची नियोजन आणि अंमलबजावणी तसेच झालेले कामाच्या नोंदी या विभागामार्फत ठेवले जातात.