रमाई आवास योजना
उद्देश:
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्यांचा घराचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना शासन निर्णय 15/11/2008 नुसार सुरु केली आहे.
कागदपत्रे:
रमाई घरकुल योजना 2022 अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थीने सादर करवयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे:
१. ७/१२ चा उतारा
२. घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल यापैकी कोणतेही एक
३. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
४. उत्पन्नाचा दाखला
५. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
६. मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड
रमाई आवास योजना अटी
• लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा.
• लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.
• लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
• लाभार्थी कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी रु. 1 लक्ष राहील.