लोकसंख्या जनगणना

विशेष एकूण पुरुष स्री
एकूण घरांची संख्या
१,८९०
लोकसंख्या
९,२१२
४,६५२
४,५६०
मूल (०-६)
१,१०४
५७७
५२७
अनुसूचित जाती
२,०९४
१,०२२
१,०७२
अनुसूचित जमाती
१,९३०
९५२
९७८
साक्षरता
८०.७७%
८८.६६%
७२.८०%
एकूण कामगार
४,१९४
२,५८३
१,६११
मुख्य कार्यकर्ता
३,००१
Content
Content
किरकोळ कामगार
१,१९३
५९१
६०२

मालेगांव तालुक्यातील रावळगावाची थोडक्यात माहिती

रावळगाव

__ पूर्व इतिहास__

महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील, साखर व मेवामिठाई यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या १३,२५२ (१९८१). हे मालेगाव तालुक्यात मालेगावच्या वायव्येस सु. १९ किमी. अंतरावर वसलेले आहे.

पूर्वी हे एक छोटे खेडेगाव होते. १९२३ नंतर प्रसिद्ध उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी या भागातील सु. ६०७ हे. पडीक जमीन काही भाडेपट्‌ट्याने व काही विकत घेऊन परिश्रमपूर्वक तिचे कृषियोग्य जमिनीत रूपांतर केले. त्यासाठी त्यांनी जवळूनच वाहणाऱ्या गिरणा कालव्याचा उपयोग करून घेतला व मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन सुरू केले. १९३३ साली वालचंद समूहातर्फे त्यांनी रावळगाव शुगर फार्म लि. ची स्थापना करून रावळगाव येथे एक साखरकारखाना उभारला. सांप्रत याची महाराष्ट्रातील मोठ्या व प्रगतिशील साखर कारखान्यांत गणना होते. याच उद्योगसमूहातर्फे १९४० मध्ये येथे खडीसाखरेचे संशोधन केंद्र व कारखाना सुरू करण्यात आला. येथील कारखान्यांचा पुढे विकास होऊन साखरेशिवाय गोळ्या, टॉफी, पेपरमिंट व इतर तत्सम वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू झाली (१९४९). ‘रावळगाव’ या नावाने हा माल प्रसिद्ध आहे. पेपरमिंटच्या वड्या, ताज्या दुधाची टॉफी, लॅको बॉन बॉन, पत्री खडीसाखर इ. येथील खास उत्पादने आहेत. यांशिवाय येथे गूळ तयार करणे, उसापासून मेण व कागद तयार करणे, साखर कारखान्यास आवश्यक अशी यंत्रसामग्री तयार करणे, मिठाईसाठी डबे तयार करणे इ. व्यवसायांचाही विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

कारखान्याच्या सभोवारच्या प्रदेशात एक आदर्श वसाहत स्थापन झाली असून संपूर्ण गावासाठी आरोग्य केंद्रे, रुग्णालय तसेच प्राथमिक-माध्यमिक शाळा, डाक व तार कार्यालय, विश्रामधाम इ. सुविधा करण्यात आल्या आहेत. गावात एका दगडी चौथऱ्यावर शनी, राम, महादेव व पिंपळदेव यांची समान आकृतीबंधाची चार मंदिरे असून त्यांच्या समोरच एक हनुमान मंदिर आहे. गावात रविवारी आठवड्याचा बाजार भरतो. या गावाजवळच असलेल्या दाभाडी या गावी सहकारी तत्त्वावर चालणारा साखर कारखाना आहे.

पण रावळगाव गोळीची सुरवात कशी झाली हे माहित आहे काय?

या चॉकलेट फॅक्टरीची स्थापना केली महाराष्ट्राचे भाग्यविधाते उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जहाजनिर्मिती कारखाना, लढाऊ विमाने बनवणारा हिंदुस्तान एरोनीटिक्स, रायफल कंपनी, कार बनवणारी प्रीमियर कंपनी सुरु करणारे वालचंद हिराचंद यांना चॉकलेट बनवावंस का वाटलं असेल?

वालचंद यांचे वडील सोलापुरातील मोठे अडत व्यापारी. वालचंद यांना त्या धंद्यात काही रस नव्हता. त्यांनी रेल्वेचे कंत्राट घेण्याच काम सुरु केलं. बार्शी लाईट रेल्वेलाईन टाकली. यानंतर बांधकाम व्यवसायात पडले. त्यात मिळालेल्या यशानंतर या दूरदृष्टीच्या उद्योगपतीने फक्त महाराष्ट्राच नाही तर भारताच भविष्य घडवणाऱ्या उद्योगधंद्याची सुरवात केली.

साधारण एकोणीसशे वीसच्या दशकात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील रावळगाव येथे जवळपास दीड हजार एकर जमीन त्यांना स्वस्तात मिळाली.
काहीही न पिकणारी पड पडलेली जमीन त्यांना अगदी नाममात्र किंमतीत मिळाली तर खरी पण तिथे करायचं तरी काय हा मुख्य प्रश्न होता. त्यांनी वेगवेगळ्या कृषीतज्ञांना, भूगर्भशास्त्रतज्ञांना बोलावलं. तिथे काय करता येईल याचा अभ्यास केला.

शेजारहून वाहणाऱ्या गिरणा कालव्याचा वापर करून जमीन पिकाऊ बनवण्यासाठी मेहनत घेण्यात आली. मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली, ती यशस्वी देखील झाली.

पुढची अनेक वर्ष या नावाने गाजवली. भारताच्या गोळ्या चॉकलेटचा पहिला अधिकृत ब्रँड म्हणून रावळगाव आजही ओळखला जातो.
अख्ख्या महाराष्ट्राच राजकारण हलवणाऱ्या साखर कारखाना उद्योगाची सुरवात वालचंद हिराचंद यांनी केलीच. पण आपण उत्पादन केलेला माल खपवण्यासाठी मार्केट कस तयार करायचं याचा एक आदर्श घालून दिला. त्यांनी त्याकाळात केलेलं मार्केटिंग ते नव्वदच्या दशकात फॉरेनच्या ब्रँडनां टक्कर द्यायला केलेल्या आक्रमक जाहिराती, क्वालिटी आणि मार्केटिंग या दोन्ही बाबतीत रावळगाव कधीच कमी पडल नाही

रावळगाव चॉकलेट बनलं यागोष्टीला आज जवळपास ऐंशी वर्षे झाली. अजूनही तुरळक ठिकाणी हे चॉकलेट मिळते. आपल्या अनेक पिढ्या या चॉकलेट गोळ्या खाऊन मोठ्या झाल्या. पण आपली पुढची पिढी तिची चव घेऊ शकेलं का माहित नाही. पण आपण ती गोड साखराळ चव विसरू शकणार नाही.

रावळगाव शुगर फार्म लिमिटेड’ ही कंपनी स्थापन करण्यात आली. सर्वप्रथम रावळगावमध्ये आंब्याची कलमे, ऊस, कापूस भुईमूग इ. विविध पिके घेण्याचे प्रयोग केले. 1933 मध्ये मात्र केवळ ऊसाच्या पिकावरच लक्ष केंद्रीत करण्यात आलं.

येथील कारखान्यांचा पुढे विकास होऊन साखरेसोबतच गोळ्या, टॉफी, पेपरमिंट व इतर तत्सम वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू झाली.

‘रावळगाव’ ब्रँडच्या नावाने येथील उत्पादन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. पेपरमिंटच्या वड्या, ताज्या दुधाची टॉफी, लॅको बॉन बॉन, पत्री खडीसाखर इ. येथील खास उत्पादने मानली जातात.

याशिवाय येथे गुळ तयार करणे, उसापासून मेण व कागद तयार करणे, साखर कारखान्यास आवश्यक अशी यंत्रसामग्री तयार करणे, मिठाईसाठी डबे तयार करणे इ. व्यवसायांचाही विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

वालचंदनगरप्रमाणेच कारखान्याच्या भोवताली एक वसाहत स्थापन झाली असून संपूर्ण गावासाठी आरोग्य केंद्रे, रुग्णालय तसेच प्राथमिक-माध्यमिक शाळा, डाक व तार कार्यालय, विश्रामधाम इ. सुविधा करण्यात आल्या आहेत. पण कालांतराने वालचंदनगर तसंच रावळगाव येथील उद्योगांन उतरती कळा लागल्याचंही दिसून येतं.

 

रावळगाव हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वसलेले एक मोठे गाव असून एकूण १८९० कुटुंबे राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार रावळगाव गावाची लोकसंख्या ९२१२ असून त्यापैकी ४६५२ पुरुष आहेत तर ४५६० महिला आहेत.

रावळगाव गावात ०-६ वयोगटातील मुलांची संख्या ११०४ आहे जी गावाच्या एकूण लोकसंख्येच्या ११.९८% आहे. रावळगाव गावाचे सरासरी लिंग गुणोत्तर 980 आहे जे महाराष्ट्र राज्याच्या सरासरी 929 पेक्षा जास्त आहे. जनगणनेनुसार रावळगावचे बाल लिंग गुणोत्तर 913 आहे, जे महाराष्ट्राच्या सरासरी 894 पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत रावळगाव गावात साक्षरता दर कमी आहे. 2011 मध्ये, रावळगाव गावाचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या 82.34% च्या तुलनेत 80.77% होता. रावळगावमध्ये पुरुष साक्षरता 88.66% आहे तर महिला साक्षरता दर 72.80% आहे. भारताच्या घटनेनुसार आणि पंचायती राज कायद्यानुसार, रावळगाव गावाचा कारभार सरपंच (गाव प्रमुख) द्वारे केला जातो जो गावाचा प्रतिनिधी निवडला जातो.